एटीएममध्ये भरायला आणलेले पैसे वाटेतच लुटले

187

वैभववाडी/प्रतिनिधी : बँक आँफ इंडियाच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली २३ लाखाची रक्कम अज्ञातांनी वाटेतच लुटली. तळेरे-वैभववाडी मार्गावर घंगाळे दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना दुपारी ३.३०च्या दरम्यान घडली.

२३ लाखाची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. कणकवलीहून ३० लाखाची ही रक्कम घेऊन बँकेचे पथक वैभववाडीकडे येत होते. त्यापैकी ७ लाख नांदगाव येथील एटीएम मध्ये भरले. उर्वरित रक्कम वैभववाडीकडे घेऊन येत असताना घंगाळेवाडी येथे चोरट्यांनी दुचाकीवरुन येऊन डल्ला मारला. भरदिवसा झालेल्या या दरोड्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here