खेळाडू निर्माण करण्याचा कारखाना उभारणार – आम.नितेश राणे

125

कणकवली प्रीमियर लीग प्रो कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ ; टेंबवाडी अभय राणे मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली/ प्रतिनिधी : कणकवलीच्या मातीतुन चांगले खेळाडू निर्माण होतील. फक्त भाषणबाजी नाही तर खेळाडू निर्माण करण्याचा कारखाना करायचा आहे. हा खेळाचा कारखाना म्हणून ओळखला जाणारा आहे. याचा तरुण – तरुणींना आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी निश्चित फायदा होणार आहे. तर अभय राणे मंडळाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत रहा. त्यासाठी सर्वतोपरी मदत आम्ही करू अशी ग्वाही आम.नितेश राणे यांनी दिली.

अभय राणे मित्र मंडळ आयोजित ए.आर.एम.चषक कणकवली प्रिमियर लिग २०२१ कबड्डीचा महासंग्राम टेंबवाडी येथील मैदानात खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, प.स.सदस्य मिलींद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, मंडळाचे सर्वेसर्वा अभय राणे, निकेश मोरजकर, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भगवान लोके, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत,बाळा सावंत,गणेश तळगावकर,विजय इंगळे,सत्यवान राणे,दिलीप साटम,संतोष राणे,बाळा पांगम,राणे गुरुजी,दिलीप राणे आदी उपस्थित होते.

समीर नलावडे म्हणाले, ब्रम्हा ,विष्णू,महेश आता एकत्र आहेत.आता या मंडळाच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धा घेतली तरी ती यशस्वी होईल.१५ कोटी रु खर्चून न.प.च्या माध्यमातून स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभे राहत आहे. पुढच्या वेळी ही स्पर्धा याच स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या मॅटवर होईल.त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगत मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

या स्पर्धेत एकूण ७ संघमालक आपले संघ उतरवणार आहेत. न्यू समर्थ संघाचे मालक रुपेश केळुसकर, अक्षय स्पोर्ट्स चे अक्षय चव्हाण, मयूर स्पोर्ट्स चे मयूर मेस्त्री, बिडीएम स्पोर्ट्स चे अनंत सरंगले, मधलीवाडी चे जोगी राणे, भालचंद्र स्पोर्ट्स चे साहिल परब, अवधुत स्पोर्ट्स चे अवधूत तळगावकर आपले दिग्गज खेळाडू या स्पर्धेदरम्यान सहभागी झाले आहेत.या सातही संघातील दिग्गज आणि मातब्बर खेळाडुंची चपळाई आणि क्रीडाकौशल्य पाहण्याची संधी कबड्डीरसिकांना मिळत आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here