जिल्ह्यासाठी सुवर्णक्षण !

193

सिंधुदुर्ग एअरपोर्टचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

चिपी/ प्रतिनिधी : अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारे बहुप्रतिक्षित चिपी विमानतळ लोकसेवेसाठी सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उदघाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक, जनरल (डॉ.) बी. के. सिंह (सेवानिवृत्त), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल, खासदार विनायक राऊत, बाळाराम पाटील, वैभव नाईक, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, अनिकेत तटकरे, नितेश राणे, प्रधान सचिव, विमानचालन, पर्यटन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री वल्सा नायर सिंह, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी दीपक कपूर आदी उपस्थित होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here