‘लोकराज्य’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

35

मुंबई/ प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या लोकराज्य या मासिकाच्या ऑक्टोबर महिन्यातील ‘महापर्यटन, संधी, सुविधा आणि प्रबोधन शताब्दी वर्ष विशेष’ या अंकाचे आज (१३ ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, संचालक (प्रशासन) गणेश रामदासी आदी उपस्थित होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here