शाळेच्या उन्नतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान

27

ओसरगांव जि.प. शाळा नं. १ शतक महोत्सवी शुभारंभ

कणकवली/ प्रतिनिधी : ओसरगाव जि.प. शाळा न.१ या शाळेच्या शतक महोत्सव शुभारंभ आणि संगणक उदघाटन प्रसंगी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा वाढता आलेख आणि माजी विद्यार्थ्यांनी जि.प. शाळेची केलेली उन्नती पाहून गौरवोदगार काढले. ही शाळा भविष्यात इतिहास घडवेल अशा शुभेच्छा दिल्या. हजारो मुलाना या शाळेने घडविले शिकविले. डॉक्टर , वकील, शासकीय अधिकारी, शिक्षक, भारतीय सैन्यात, खाजगी नोकरीत , व्यावसायिक , अभियंते, कंत्राटदार, व्यापार वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी नावारूपास आहेत. असंख्य विद्यार्थी नोकरीनिमित्ताने मुंबईस्थित, परगावी आहेत. शाळेचे पांग कधीच फिटणारे नाहीत. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शतक महोत्सव साजरा करीत असतानाच नवपिढीला अद्यावत शिक्षण , इग्रंजी भाषेवर प्रभुत्व, अवकाश दर्शन कार्यशाळा, विज्ञान कार्यशाळा, संगणक ज्ञान, कलाकृती, वेगवेगळे उपक्रम राबवावेत या हेतूने शाळेचे माजी विद्यार्थी ॲड विलास परब यांचे नेतृत्वाखाली समिती स्थापन करुन आगळ्या वेगळ्या रितीने महोत्सव साजरा करण्याचे ठरवून निधी संकलनास सुरूवात केली. तलावाशेजारी हायवेनजिकची शाळा नजरेत भरावी , मुले शाळेत रमावीत अशा पध्दतीने शाळेचे रंगकाम, थोर पुरूषांची ओळख चित्रे , उत्कृष्ट गेट बांधणी, व्यासपीठ बांधणी इत्यादी स्वनिधीतून कामे केली आहेत.. डॉ मोहीते यानी यापूर्वी लॕपटाॕप , बेंचेस प्रदान करून दातृत्व दाखविले आहे. महोत्सव शुभारंभी माजी विद्यार्थी श्री विलास राणे यांच्या कुटुंबिय, श्री हरिश्चंद्र मोरे, विठ्ठल राणे, विनायक पाटील यानी तिन संगणक शैक्षणिक साॕफ्टवेअरसहीत टेबल व बेंचेस देऊन शाळेप्रती प्रेम व नवपिढीस संगणकीय ज्ञान अवगत व्हावे हा हेतू ठेवला आहे. मधल्या काळात कोरोना विषाणू मुळे थोडा खंड पडला असला तरी ओसरगावातील या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा सर्वांगाने समृद्ध करण्याचा चंग बांधल्याने शाळा अल्पावधीत नावारूपास येतेय. कोण म्हणतो जि प च्या शाळा मागे असतात? खाजगी शाळांकडे कल का वाढतो? हे सर्व प्रश्न आपल्या शाळेस लागू नाहीत असे काम होऊन शाळेची भरभराट व्हावी अशा एकमेव हेतूने समितीचे काम सुरूआहे . लहान थोर , पदाधिकारी असा कोणताही भेदभाव मनी न ठेवता माझी शाळा या विलक्षण भावनेने समान पातळीवर वागणे बोलणे, विचारांचे आदान प्रदान होत आहे . गतवर्षी मुलानी भाजी मार्केट भरवून मुलांना हिशोब, व्यापार आणि बोलणे चालणे याचे ज्ञान प्राप्त झाले. मुलानी आपली कमाई शाळेच्या प्रगतीसाठी दान करुन दातृत्वाचा धडा अंगिकारला. कोरोना काळातही आॕनलाईन स्पर्धांचे आयोजन केले. महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात सर्व आजी माजी शिक्षकांचा सत्कार गौरव करण्याचाही मानस आहे. शाळेसमोर सभा मंडप, सुसज्ज बाथरूम, गार्डन, संगणक कक्षावरील पहील्या मजल्याचे बांधकाम वगैरे उपक्रम नजरेसमोर ठेऊन आत्ताच आखणी आणि पाठपुरावा सुरू आहे. शाळेचा परिसर , स्थान , सोयी सुविधा पाहता तालुक्याच्या कार्यशाळा , प्रशिक्षणे , शासकीय कार्यक्रम , गावातील कार्यक्रम या प्रांगणात भविष्यात होतील असे चित्र उभारणी घेऊ लागले आहे.
शाळेची होऊ घातलेली नजरेसमोरची प्रगती, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वागिंण विकासासाठी जातीने लक्ष देण्याचा उपक्रम ऐकून पालक वर्गाने आपले मुल जि.प. शाळेत दाखल करण्याची विचारणा होऊ लागली आहे. आपली या शाळेत बदली होऊन आपणास सेवा करायला मिळावी याची उपक्रमशील शिक्षकांची विचारणा होऊ लागली आहे.
एक वैशिष्ट्य पूर्ण शाळा व्हावी अशा नव संकल्पना राबविण्याची या माजी विद्यार्थ्यांची इच्छा आहे. मुंबईस्थित विद्यार्थी शाळेकडे जातीने लक्ष देत आहेत. वाॕटसप गृपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहून शाळेच्या प्रगतीचा आलेख पाहतात.

अद्यावत संगणक कक्षाचे उदघाटन , गेटचे अनावरण नुतन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक व माध्यमिक ) डॉ मुश्ताक शेख यांच्या शुभहस्ते सरपंच प्रमोद कावले यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिप सदस्य सायली सावंत , पंस सदस्य मिलिंद मेस्री, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्र प्रमुख सुरेश हरकुळकर यांच्या उपस्थितीत दिनांक १२/१०/२०२१ रोजी पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थी शैलेश तांबे आणि आभारप्रदर्शन विवेक परब यानी केले. संगणक दाते विलास राणे यांचा सत्कार करण्यात आला. घनशाम राणे यानी मुलासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. मुलानी विलास राणे यांची स्नुषा सौ राणे यांच्याकडून संगणकाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली आहे .

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here