सिंधुदुर्ग किल्ला शिवरायांनी बांधला, नाहीतर…; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

183

चिपी/ प्रतिनिधी : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणावर पलटवार केला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला नाहीतर काहीजण म्हणतील तो आम्हीच बांधला, अशा शेलक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं.

सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे ऑनलाईन उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना राणे समर्थकांनी अचानक घोषणाबाजी सुरु केली. यानंतर काही क्षण आपलं भाषण थांबवत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी खास तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्ही इतकं लाबं राहुन सुद्धा मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा आणि मातेचा एक संस्कार असतो मातीच्या वेदना काहीवेळा मातीत जाणे. कारण या मातीत अनेक झाडं उगवतात काही बाभळीची असतात तर काही आंब्याची असतात. आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करु, अशा शब्दांत त्यांनी राणेंवर निशाणा साधला.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here