ज्येष्ठ पत्रकार राजन आनंद चव्हाण यांची वेध घेणारी लेखमाला लवकरच… !
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पहिल्या दोन प्रशासकांच्या कारभारातील अनेक सुरस कथा आता समोर येऊ लागल्या आहेत.एका प्रशासकाच्या काळात तर सर्व सूत्र मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आणि एका कर्मचाऱ्याच्या ईशाऱ्यावर,तालावर तर याच कालावधीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्याच्या सल्ल्याने चालत होती.
या कालावधीत विकासाची किती कामे झाली…? किती लोकांचे प्रश्न सुटले…? हा संशोधनचा विषय आहे. एक मात्र नक्की, खरेदी भरपूर झाली.कांही प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले.तर ‘मॅनेज’ कारणाऱ्या एक-दोन अधिकाऱ्यांनी चांगलेच हात धुऊन घेतले. त्यानंतर लगेचच आलेला दुसरा प्रशासक तर अतिशय साधा, भोळा शंकर.या प्रशासकाला भ्रष्ट. लुटारू चौकडीने चांगलेच घेरले, मनमानी कारभार केला आणि मौजमजाही केली.
तिसरे प्रशासक आल्यानंतर मात्र या सगळ्याला चांगलाच चाप बसला आहे. मात्र मुंबई, मंत्रालयातील ‘त्या ‘ अदृश्य शक्तीचा दैनंदिन कारभारातला हस्तक्षेप आजही कांही प्रमाणात सुरूच आहे.
या तिन्ही प्रशासकांच्या कारभारावर प्रकाशझोत टाकणारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामान्य प्रशासन,ग्रामपंचायत,आरोग्य,वित्त, महिला व बाल कल्याण विभागांच्या कारभाराचा वेध घेणारी ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण,
यांची लेखमाला लवकरच …!
Leave a Reply