सतीश सावंत यांचे खंदे समर्थक चंद्रशेखर सावंत भाजपात

कणकवली/ प्रतिनिधी : शिवसेना उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचे खंदे समर्थक भिरवंडे विकास सोसायटी चे व्हाईस चेअरमन तसेच गांधीनगर गावचे माजी सरपंच चंद्रशेखर सावंत, गांधीनगर गावचे विद्यमान उपसरपंच राजेंद्र उर्फ बाळा सावंत, माजी सरपंच सतीश सावंत, गुरुप्रसाद सावंत व गांधीनगर गावातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील ओम गणेश निवास्थानी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि.प अध्यक्षा संजना सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, राजू पेडणेकर, मयुरी मुंज राजश्री पवार मीनल पवार, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गांधीनगर गावासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु उर्वरित विकास कामे ही पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून व माजी जि. प अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांचा असलेला सततचा पाठपुरावा यामुळे गावात विकासकामे होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *