किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठान कडून स्वच्छता अभियान!


मसुरे :
दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने किल्ले रामगड वर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत दुर्गवीरांसोबत स्थानिक शिवप्रेमी सागर घाडीगावकर आणि मित्रमंडळी (किर्लोस) यांनी सहभाग घेतला.
यावेळी गडावरील होळीचा दरवाजा, वाड्याचे अवशेष आणि नजीकच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. पूर्णपणे झाडी-झूडपांनी वेढलेल्या या भागात स्वच्छता करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने दुर्गवीरांनी गडकोटांचे महत्व विषद करतानाच एकंदरीत संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि यापुढे ही या शिवकार्यास हातभार लावण्याचे आवाहन केले.
दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागचे स्वराज घाडीगावकर, सुनिल घाडीगांवकर, सागर घाडीगावकर,
किरण पांचाळ,निखिल भावे, साहिल घाडीगावकर,सोहम घाडीगावकर,यश भावे,
संतोष भावे, विराज घाडीगांवकर, हर्षद घाडीगावकर, प्रकाश परब, शेखर घाडीगावकर,कमलाकर घाडीगावकर,अतल तांबे, अभि नारकर,
सचिन लाड, शुभम घाडी, मिलिंद चव्हाण,
मधुकर विचारे, प्रणय चव्हाण, वेदांत लाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *