वैभव नाईक यांनी केलं पालकमंत्र्यांचं अभिनंदन



सिंधुदुर्गवासियांसाठी  टोलमाफीच्या निर्णयाचं केलं स्वागत

कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल बाबत घेतलेल्या भूमिकेचं माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलंय. सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं ? अस सांगून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा वैभव नाईक यांनी कुडाळ येथे  व्यक्त केली आहे.
  ओसरगाव येथील टोलनाक्यावरून टोल वसुली प्रस्तावित आहे. त्यातही हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील राजकीय वक्तव्याने देखील रंगली आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, तसेच सिंधुदुर्गवासियांसाठी टोलमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर यासाठी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग वासियांसाठी टोलमाफी  केली जाईल अशी घोषणा केली आहे. त्याबाबत माजीआमदार वैभव नाईक याना विचारले असता, त्यांनी पालकमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच केले आहे. टोलमाफी होत असेल तर आंदोलन का करावे अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली आहे. गेली काही वर्षे या महामार्गाचे काम सुरु आहे. अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर टोलवसुली करू न नये अशी आमची मागणी आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आमही स्वागत करतो. आणि हि अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी अशी अपेक्षा माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ठाकरेसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *