होये खेका जठार ?


मुंबई / ऋषी श्रीकांत देसाई
भारतीय जनता पक्षाची विधान परिषदेची यादी जाहीर झाली आणि त्यात प्रमोद जठार नाव झळकला , आणि खराच बरा वाटला.. बरा एकाच कारणासाठी निष्ठावंत म्हणून निवडीत राज्यभरातल्या पाचात एक प्रमोद जठार निघाले.. अर्थात ह्यावेळी जिल्ह्यातील भाजपची दोन  आणि उबाठा गटात दोन अशी जिल्ह्यातील चार नावा चर्चेत होती, आमकां बाबा सिंधुदुर्ग शब्द ईलो की उगाच पेटारे पेटवची सवय हा.. जिजी आणि राजन एकाच दिवशी आमदार झाल्यापासून आमकां विधान परिषद ह्यो इंटरेस्टिंग विषय वाटता म्हणून आसात कदाचित

ते माका ओळखतत , आणि मी तेंका ओळखतय ह्या असल्या नको त्या समजूतीतले आम्ही नायच आसव. मी स्पष्ट सांगतय आमची कामा फक्त प्रतिक्रिया मागणा आणि एखादो विषय चलवना.. बस्स संपला.. ते आमच्याकडे गणपतीला आले आणि मगे आम्ही दिवाळीला तेंच्याकडे गेलो म्हणान फोटो छापणा असले हे आमचे विषयच नाय !

आज जठार निवडीनंतर “आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवा चेकमेट” असले विषय चघळवण्यात काय हशील हा देव जाणे ? कोणाक माहीत नसात तर सांगतय जेवढे पक्के निष्ठावंत भाजपवाले कार्यकर्ते बघलय त्या प्रत्येकाक आपलो पक्ष मोठो होवक होयो असा मनोमन वाटता आणि दिलेली जबाबदारी ते मनापासून पार पडतत.. पक्ष म्हणजे काय ह्या शिकाक राजन म्हापसेकर, नकुल पार्सेकर, विजू केनवडेकर, अशी दोन तीन नावा माहीत असली तरी खूप हा ! ते जिंकाक खूप वाट बघतत आणि त्याच्या आधी पदोपदी हरतत, पक्ष जिंकाक होयो म्हणून कायव झाला स्वतःक हरवन घेवच्या जगातील माणसा आसत ती !!

आणि मुळात दादा भाजपमध्ये इले तेव्हा, माझा पक्ष आज हाऊसफुल्ल झाला असा म्हणनारो जो माणूस हा तेंका ठावक असता की आपणाक जेव्हा गर्दी असता तेव्हा जरा सायडीक उभ्या रवान सगळ्यांका जागा करून देवक होई! तेंका ह्या आधी तिकीट गावान निवडान इल्यार जेवढा कौतुक झाला नसता तितक्या काल विधान परिषदेक उमेदवारी गावान जठार हेंचा कौतुक होता.. अर्थात तेचा कारण  त्यांच्याच राजकिय व्यवस्थेत हा ह्या आम्ही वेगळा सांगायची गरज नाय..

सत्तेत असताना अशी माणसा मोठी होवक होई, निदान तेंका चुकतास तुम्ही म्हणून जाहीर सांगाची नैतिक ताकद तरी मिळता.. आज आमच्यात बाबा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हेंच्या बरोबर बोलाची ताकद नाय रवली हा , तुमका मुंबईत बसान काय कळता ह्या एकच उत्तर सगळ्यांकडे असता ! अशावेळो जठार यांच्यासारखी माणसा तुमच्या सोबत बोलताना आधी तुमका, मग आपल्या सगळ्या नेत्यांका , आणि मग आपल्या पक्षांक मोठे करतत.. कधीव त्यांचा भाषण आयका, कायम खासदार साहेब, पालकमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब ह्यांचा आदरार्थी आणि त्यांच्या कामाचा गौरवार्थी उल्लेख हेच्याशिवाय काय नसता.. आणि कोण समोर नसतानाय तेंचो क्रम चुकना नाय ह्यो विषय जास्त खूप महत्त्वाचो हा !

2009 ते 2014 ह्या जोखमीच्या काळात प्रमोद जठार, काका कुडाळकर, जिजी उपरकर, राजनभाई तेली ही माणसा आमकां टिव्ही वाल्यांका तेव्हा खणखणीत बाईट म्हणून गरजेनुसार गावत.. ती राजकारणात आता खय आसत ह्यो निकष मेरिट लावतस की जिंकलेले कधी म्हणून मेरिट लावतस ह्यो जेचो तेचो विषय..

पण माका वाटता, आता बघा जठार लढाई करतले म्हणून वगीच कोणी मनातल्या “निजा नको आता चादरवालो येतलो अशी स्वप्नाव बघुवं नये”.. जा चालला हा त्याच्यात काय बदल होवचो नाय.. आणि बरा चलला हा, आपण सगळ्यांनी आमकां गरजेचा हा ता वायच जादा आमकां सगळ्यांका देवया ह्या मागूक शिकया.. बाकी कोणतरी खूप वर्षांनी केवळ निष्ठा ह्या एका शब्दावर जिंकले ह्या अप्रुपाचा कौतुक आणि दोन चार दिवस तरी नक्की रवतला म्हणा !

बाकी कायच अपेक्षा नाय राज्यकर्ते म्हणून आमच्याशी बोला, करवादलव तर आयका ह्या एकाच अपेक्षेने आता तुमचा तुम्हीच सिद्ध करा

खेका होये जठार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *