कुडाळात ‘ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग’ अभियानाचा शुभारंभ

कुडाळात ‘ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग’ अभियानाचा शुभारंभ
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी “एकच ध्येय – ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग” या उपक्रमाचा भव्य शुभारंभ गुरुवार, दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता बॅ. नाथ पै कॉलेज, एमआयडीसी कुडाळ येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला वरिष्ठ आय आर एस अधिकारी, अतिरिक्त आयुक्त (चेन्नई) तसेच माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे  यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर याही उपस्थित राहणार आहेत.
हा उपक्रम बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग, साई जळवी फिल्म्स आणि ‘तरुण भारत (संवाद)’ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालणे, जनजागृती करणे आणि समाजाला ड्रग्समुक्त करण्याचा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, नागरिक व सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *