30 जानेवारी रोजी होणार शिबिर
अपंग बांधवासाठी उत्कृष्ट उपक्रम
कुडाळ :
पायाने अपंग असलेल्या गरजूना कृत्रिम जयपूर फुट देण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत दत्तमंदिर, राऊळ महाराज समाधी मंदिर पिंगुळी येथे होणार आहे. यासाठी अधिकाधिक अपंगानी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. परमपूज्य सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या 41 व्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून प. पू. श्री. विनायक (अण्णा ) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट पिंगुळी यांचे मार्फत व रोटरी कल्याण मंडळ कोल्हापूर, सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी आणि प्राध्यापक डॉ. एस. एन. ओझा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एच डी पी ई नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले कमी वजनाचे आणि 150 किलो वजन घेणारे मोजमाप घेतलेल्या अपंगाना फुटचे वितरण प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या जयंती दि. 13 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता सद्गुरू राऊळ महाराज संस्थान पिंगुळी येथे करण्यात येणार आहे. पायाने अपंग असलेल्या जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा तसेच यासाठी अनिल होडावडेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी कोषाध्यक्ष दशरथ राऊळ वतीने करण्यात आले आहे.








Leave a Reply