आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

🌷जि.प. व पं.स. निवडणुकीची रंगत वाढली🌷उमेद्वारी अर्जाबाबत सस्पेन्स कायम


कुडाळ : प्रतिनिधी

जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज बुधवार दि. २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे जिल्हाभरात सर्वच तालुक्यात इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार असून, अनेक ठिकाणी उमेदवार फिक्स झाले आहेत. तर काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता असून, काही मतदारसंघात शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. भाजपा, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांसह अपक्षांनीही उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *